Posts

समर्थ विचार

ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे."  मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता.  भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ?  लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे.  पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला.  मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले !  आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्या कशाचीही आठवण ठेवली नाही.  माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण...

समर्थ विचार : मी

कर्म करताना सावध राहा... कारण मी पाहत आहे...तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे... आदी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी सर्व साक्षी अनंतरुपी समर्थ मी आहे.. मी फक्त देह बदलत असतो..स्वरूप तेच असत म्हणून सावध राहा... सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे... एकच सत्य शाश्वत, सत्य फक्त मी आणि मीच आहे... 

माहिती : वसुबारस

वसुबारस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. 🚩आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिव...

समर्थ विचार : राम

३० ऑक्टोबर - ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥ रामाचा हात माझ्यामागे हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावे जगांत ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥  भावे धरितां रघुपति । सर्व संकटे दूर जाती ॥  भोगांत नामाचे न व्हावे विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥ देहाचे भोग देहाचे माथी । त्याची न मानावी खंती ॥ विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांही चांगले होऊन जाई ॥ आपला भार घेतला रामानें । विश्वासाने सत्य मानणें खरे ॥  सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥ जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥ शरीर आहे दों दिवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥ रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥ मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥  गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येतेखास ॥ जें जें होणार ते होतच जाते । विनाकारण मन कष्टी होते ॥ माझे प्रपंची नाहीं सुखदुःख । असे ज्याने जाणले चित्तीं । त्याचा संसार झाला सुखाचा निश्चितीं ॥ ज्याने दिली रामाची संगति । त्याचा विषाद न मानावा चित्तीं ॥ उद्विग्नतेचें कारण ...

समर्थ विचार : आळशी

आळशी धरून परावी आस | प्रेत्न सांडी सावकास ।। निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७|| दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो, त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात. याउलट आळस झटकून, दुसऱ्याबद्दल चाहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो, तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे ...

समर्थ विचार : आईचा लाघवी लेक

आईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण ) परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले?’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले. साधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय ...

समर्थ विचार : स्मरण

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण :) श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला. वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । । हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या काळात आणि समर्थांचे समकालीन असे जे संत-सज्जन होऊन गेले त्या सर्वांचा भर ईश्वरोपासना, योग, समाधी, स्वर्गप्राप्ती, मोक्ष किंवा कर्मकांड अशा गोष्टींकडे विशेष होता. त्यांना परमेश्वराच्या प्राप्तीची तीव्र ओढ लागून राहिली होती. समर्थांना ही ओढ नव्हती असे नाही, पण त्याचबरोबर देव, धर्म नीटपणे चालवावयाचा असेल तर राज्य – शासन परकीय असून चालणार नाही, ते आपलेच पाहिजे आणि आपले म्हणजे आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणारे असले पाहिजे ही गोष्ट समर्थांनी बरोबर हेरली होती, असे दिसते. म्हणूनच समर्थ हे संतपरंपरेत वेगळे दिसतात असे म्हटले. समर्थांनी देव, धर्म या विषय...