Posts

Showing posts from October, 2021

माहिती : वसुबारस

वसुबारस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. 🚩आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिव...

समर्थ विचार : राम

३० ऑक्टोबर - ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥ रामाचा हात माझ्यामागे हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावे जगांत ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥  भावे धरितां रघुपति । सर्व संकटे दूर जाती ॥  भोगांत नामाचे न व्हावे विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥ देहाचे भोग देहाचे माथी । त्याची न मानावी खंती ॥ विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांही चांगले होऊन जाई ॥ आपला भार घेतला रामानें । विश्वासाने सत्य मानणें खरे ॥  सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥ जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥ शरीर आहे दों दिवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥ रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥ मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥  गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येतेखास ॥ जें जें होणार ते होतच जाते । विनाकारण मन कष्टी होते ॥ माझे प्रपंची नाहीं सुखदुःख । असे ज्याने जाणले चित्तीं । त्याचा संसार झाला सुखाचा निश्चितीं ॥ ज्याने दिली रामाची संगति । त्याचा विषाद न मानावा चित्तीं ॥ उद्विग्नतेचें कारण ...

समर्थ विचार : आळशी

आळशी धरून परावी आस | प्रेत्न सांडी सावकास ।। निसुगाईचा संतोष | मानी,तो येक मूर्ख ||१७|| दुसऱ्यावर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो, त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात. याउलट आळस झटकून, दुसऱ्याबद्दल चाहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो, तो शहाणा मानावा असं म्हटलं आहे ...

समर्थ विचार : आईचा लाघवी लेक

आईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण ) परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले?’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले. साधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय ...

समर्थ विचार : स्मरण

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण :) श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला. वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । । हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या काळात आणि समर्थांचे समकालीन असे जे संत-सज्जन होऊन गेले त्या सर्वांचा भर ईश्वरोपासना, योग, समाधी, स्वर्गप्राप्ती, मोक्ष किंवा कर्मकांड अशा गोष्टींकडे विशेष होता. त्यांना परमेश्वराच्या प्राप्तीची तीव्र ओढ लागून राहिली होती. समर्थांना ही ओढ नव्हती असे नाही, पण त्याचबरोबर देव, धर्म नीटपणे चालवावयाचा असेल तर राज्य – शासन परकीय असून चालणार नाही, ते आपलेच पाहिजे आणि आपले म्हणजे आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणारे असले पाहिजे ही गोष्ट समर्थांनी बरोबर हेरली होती, असे दिसते. म्हणूनच समर्थ हे संतपरंपरेत वेगळे दिसतात असे म्हटले. समर्थांनी देव, धर्म या विषय...

समर्थ विचार : श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा

श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा  सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत.पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते.अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो.गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच.वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी.गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे.समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली.गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला.दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले.व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले.एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत आसता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले.कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या.भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता.कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्थाकेली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी...

समर्थ विचार : याप्रमाणे जो जीवन जगेल तो धन्य होईल असा श्रीसमर्थांचा अभिप्राय आहे.

याप्रमाणे जो जीवन जगेल तो धन्य होईल असा श्रीसमर्थांचा अभिप्राय आहे, समास तिसरा : सिकवणनिरूपण-१ ||११.३|| मानवी जीवनाची प्रपंच आणि परमार्थ ही दोन अंगे होत. सामान्य माणसाने आपल्या जीवनाला सुंदर वळण कसे द्यावे हे सांगण्यासाठी एका दिनक्रमाची रूपरेषा श्री समर्थांनी या समासात सांगितली आहे. त्यातील महत्त्वाची तत्त्वे पुढीलप्रमाणे होत.  १] जीवन यशस्वी होण्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही पाहिजेत.  २] जीवनाची नासाडी करणाऱ्या आळसासारखा माणसाचा दुसरा शत्रु नाही.  ३] सकाळी लवकर उठावे  ४] सकाळी आत्मचिंतन करावे  ५] सकाळी पाठांतर करावे  ६] गोड वाणीने लोक खूष ठेवावे  ७] आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे ८] आपले कमावून आपण खावे, समाजाचे फुकट खाऊ नये ९] ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करावे  १०] आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे  ११] अडचणीत सांपडलेल्या माणसांना मदत करावी  १२] दुसऱ्यासाठी शरीर थोडेतरी कष्टवावे  १३] भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा. १४] प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा अवश्य असावा  १५] परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा.  ...

NB : जीवनाचे 4 नियम

जीवनाचे 4 नियम नियम 1 - तुमचं काम हे केवळ तुमच्या कामापुरतंच नाहीये, तर, तुमच्या कामामुळेच तुमच्या जीवनाचं गाडं चालणार आहे. किंबहुना, तुमच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही करत असलेलं काम हे लक्षात ठेवा. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, तुमचं काम, तुमच्या आर्थिक बाबी, तुमची मुलं हे सगळे मिळून तुमचं जीवन आहे आणि म्हणूनच या सगळ्याच बाबी तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच, जेव्हा तुम्ही स्वतःची प्रगती साधण्याच्या दृष्टीने जीवनाचा विचार करायला लागाल, त्याबरोबरच तुमच्या जीवनातील या अन्य सर्व घटकांचीही प्रगती होत जाईल. नियम 2 - जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघाल तेव्हा तुमच्या अडचणी क्षुल्लक होत जातील.. अनेक मोठ्या लोकांकडून हे वाक्य आजवर शेकडो वेळा तुम्ही ऐकलं असेल. क्रीस डो नावाच्या एका शिक्षकाने नुकतंच हे वाक्य त्यांच्या एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, या शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलचे तब्बल मिलीअन सबस्क्राईबर्स आहेत. एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं गेलं की तुम्ही १ बिलिअन सबस्क्राईबर्स चं ध्येय का ठरवलत? तेव्हा त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, जेव्...

समर्थ विचार : विवेक

दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य | याचा करूं नये नास |  दास म्हणे सावकास | विवेक पाहावा || आधी मनुष्यजन्म मिळणे दुर्लभ असते. त्यात दीर्घ-आयुष्य लाभणे आणखीन दुर्लभ होय. म्हणून असे मौल्यवान दीर्घायुष्य लाभले असता त्याचा नाश करू नये. मी रामदास म्हणतो की तुम्ही शांतपणे विवेकविचार करावा. जर उत्तम विवेक साधला नाही तर सारा मामला अविवेकाचा होतो आणि मग अविवेकी माणूस दीनवाणा/दरिद्री दिसतो. अशा या दीन स्थितीला तोच स्वतः जबाबदार असतो. उदासीन वृत्तीचा माणूस आळशी होतो, वाईट संगतीला लागून पाहता पाहता पार नागवला वा बुडवला जातो. सतत मूर्खपणाच्या वागणूकीमुळे अंगी बाष्कळपणा आला, पोरकटपणा वाढला, तरुणपणातील कामरूप चांडाळाने घाला घातला असे होते. असा हा मूर्ख, आळशी आणि तरुण माणूस सर्वच दृष्टीने दीनवाणा होऊन राहतो. त्याला कोणाकडून कांहीही आधार मिळत नाही, याला काय म्हणावे ! जीवनाला जे जे आवश्यक असते, त्यापैकी काहीच त्याच्याजवळ नसते. साध्या अन्न आणि वस्त्रालाही तो मोताद होतो, पारखा होतो. अंतर्यामी एकही उत्तमगुण नाही की कांहीच नाही. धड नीट बोलतां येत नाही की, बसतां येत नाही. प्रसंग वगैरे काहीच कळत नाही, शरीर आणि ...

समर्थ विचार : उपासनेचा आश्रोय

माणसाने कुठेतरी अनन्य व्हावे. आम्ही सर्व प्रपंचात अनन्य आहोत. आमचा अनन्यतेचा विषय बदलत राहतो. उदा. मुलांचा शाळेत प्रवेश, मुलीचं लग्न मग आपण ह्या प्रश्नांशी अनन्य होतो. रात्रंदिवस तेच विचार. ही अनन्यता त्यात्या विषयावर तात्पुरती आहे. मग हे जे मन आहे ते गोठवावं भागवंतापाशी,  म्हणजे अनन्यता येईल. आपले मनाचे सर्व व्यापार आहेत ना ते सगळे गोठवायचे. आपल्यामध्ये लक्ष देण्याची एक शक्ती आहे.आपले लक्ष , जाणीव आपल्या संपूर्ण शरीराला व्यापून आहे. तुम्ही जेथे आपल्या मनानी जाल तीथे ते लक्ष, ती जाणीव येते. ही जी मनाची लक्ष देण्याची जी शक्ती  आहे ती एकाग्र  आणायला पाहिजे. अशा एकाग्रपणे अनन्यतेने नामस्मरण झालं  तर परमात्मा भेटतो. उपासनेत हे पाहिजे. देवपूजेच सामर्थ्य जबरदस्त आहे. पहिल्यांदा बाहेरून पूजा करावी तिचे पर्यवसान मानसपूजे मध्ये झालं की मानसपूजा प्रत्यक्ष व्हायला लागते. ती एकाग्रतेला फार मदत करते. त्यात आपलं मन एकत्र आणता तिथे ते गोठत. ध्यानाला पूजेला बसलात की  प्रथम मनाला सांगावे आता नाही आता विचार येऊ द्यायचे नाही. हळूहळू विचार येईनासे होतात. हे पर्युपासते आहे. मानसपूजा...