समर्थ विचार : उपासनेचा आश्रोय
माणसाने कुठेतरी अनन्य व्हावे. आम्ही सर्व प्रपंचात अनन्य आहोत. आमचा अनन्यतेचा विषय बदलत राहतो. उदा. मुलांचा शाळेत प्रवेश, मुलीचं लग्न मग आपण ह्या प्रश्नांशी अनन्य होतो. रात्रंदिवस तेच विचार. ही अनन्यता त्यात्या विषयावर तात्पुरती आहे. मग हे जे मन आहे ते गोठवावं भागवंतापाशी, म्हणजे अनन्यता येईल. आपले मनाचे सर्व व्यापार आहेत ना ते सगळे गोठवायचे. आपल्यामध्ये लक्ष देण्याची एक शक्ती आहे.आपले लक्ष , जाणीव आपल्या संपूर्ण शरीराला व्यापून आहे. तुम्ही जेथे आपल्या मनानी जाल तीथे ते लक्ष, ती जाणीव येते. ही जी मनाची लक्ष देण्याची जी शक्ती आहे ती एकाग्र आणायला पाहिजे. अशा एकाग्रपणे अनन्यतेने नामस्मरण झालं तर परमात्मा भेटतो.
उपासनेत हे पाहिजे. देवपूजेच सामर्थ्य जबरदस्त आहे. पहिल्यांदा बाहेरून पूजा करावी तिचे पर्यवसान मानसपूजे मध्ये झालं की मानसपूजा प्रत्यक्ष व्हायला लागते. ती एकाग्रतेला फार मदत करते. त्यात आपलं मन एकत्र आणता तिथे ते गोठत. ध्यानाला पूजेला बसलात की प्रथम मनाला सांगावे आता नाही आता विचार येऊ द्यायचे नाही. हळूहळू विचार येईनासे होतात. हे पर्युपासते आहे. मानसपूजा मनाला आनंद देते. कोणीही सत्पुरुष मानसपूजेशिवाय तयार झाला नाही.
"घेतो कल्पनेचे भोग | न मानता बाह्यरंग || तुम्ही कल्पनेने दिलेले भोग तो घेतो , कारण ही सृष्टी संकल्पमय आहे. तुम्ही संकल्प केल्यानंतर साक्षात होतं ते. अशी उपासना असावी.
Comments
Post a Comment