समर्थ विचार : याप्रमाणे जो जीवन जगेल तो धन्य होईल असा श्रीसमर्थांचा अभिप्राय आहे.
याप्रमाणे जो जीवन जगेल तो धन्य होईल असा श्रीसमर्थांचा अभिप्राय आहे,
समास तिसरा : सिकवणनिरूपण-१ ||११.३||
मानवी जीवनाची प्रपंच आणि परमार्थ ही दोन अंगे होत. सामान्य माणसाने आपल्या जीवनाला सुंदर वळण कसे द्यावे हे सांगण्यासाठी एका दिनक्रमाची रूपरेषा श्री समर्थांनी या समासात सांगितली आहे. त्यातील महत्त्वाची तत्त्वे पुढीलप्रमाणे होत.
१] जीवन यशस्वी होण्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही पाहिजेत.
२] जीवनाची नासाडी करणाऱ्या आळसासारखा माणसाचा दुसरा शत्रु नाही.
३] सकाळी लवकर उठावे
४] सकाळी आत्मचिंतन करावे
५] सकाळी पाठांतर करावे
६] गोड वाणीने लोक खूष ठेवावे
७] आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे
८] आपले कमावून आपण खावे, समाजाचे फुकट खाऊ नये
९] ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करावे
१०] आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे
११] अडचणीत सांपडलेल्या माणसांना मदत करावी
१२] दुसऱ्यासाठी शरीर थोडेतरी कष्टवावे
१३] भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा.
१४] प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा अवश्य असावा
१५] परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा.
याप्रमाणे जो जीवन जगेल तो धन्य होईल असा श्रीसमर्थांचा अभिप्राय आहे, असं स.भ. प्रा. के. वि. बेलसरे यांनी आवर्जून नमूद केलं आहे.
Comments
Post a Comment